जिल्ह्यात महिनाभरात वाढले ८५८४ कोरोनाबाधीत महिनाभरात २०६ रुग्णांचा मृत्यू

Foto
औरंगाबाद जिल्ह्यातील ऑगस्ट महिन्यातील कोरोनाच्या रुग्णांचा अहवाल पाहिला तर १ ऑगस्ट ते काल रात्रीपर्यंत ८५८४ कोरोनाच्या रुग्णांची भर पडली आहे. यामुळे जिल्ह्यातील एकूण कोरोनाबाधितांची संख्या ही २२९११ वर जाऊन पोहचली आहे. तर ऑगस्ट महिन्यात कोरोनामुळे २०६ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे आजपर्यंत कोरोनामुळे मृत्यू होण्याची संख्या ही ६८४ वर जाऊन पोहोचली आहे. 

कोरोनाचा प्रादुर्भाव कमी होण्यासाठी लॉकडाऊन करण्यात आले होते. त्या काळात कोरोनाबाधितांची संख्या अत्यंत कमी होती. मात्र हळूहळू जिल्ह्यातील बाजारपेठ सह आदी सर्व पूर्वपदावर येणे सुरू झाले. नागरिकांचा घराबाहेर वावर देखील वाढला. याशिवाय अँटीजन टेस्ट देखील मोठ्या प्रमाणावर करण्यात आल्या. त्याचा परिणाम कोरोनाबाधितांची संख्या समोर यायला लागली आहेत. त्यात ऑगस्ट महिन्याचा कोरोनाचा अहवाल पाहिला तर जवळपास ८५८४ कोरोनाबाधीतांची वाढ झाली आहे. त्यामुळे चिंता आणखी वाढली असून नागरिकांनी अजूनही काळजी घेण्याची गरज आहे हे स्पष्ट होते. अनेकजण अजूनही घराच्या बाहेर पडताना तोंडाला मास्क लावत नाहीत, सोशल डिस्टसिंग देखील अनेकठिकाणी पाळले जात नाही. त्याचा परिणाम कोरोनाचा संसर्ग वाढत आहे. १ ऑगस्ट ते २९ तारखेच्या रात्रीपर्यत आलेला कोरोनाच्या अहवालानुसार ८५८४ रुग्णांची नव्याने भर पडली आहे. त्यामुळे जिल्ह्यातील एकूण कोरोनाबाधितांची संख्या ही २२९११ झाली आहे. 
महिनाभरात ६९३६ जण बरे होऊन घरी परतले
जिल्ह्यात १ ऑगस्टपर्यत १४३२७ कोरोनाच्या रुग्णांची संख्या होती. त्यापैकी १०६०१ रुग्ण बरे होऊन घरी गेले होते. तर काल रात्रीपर्यंत हा आकडा १७५३७ वर जाऊन पोहचला आहे. असे एकूण ऑगस्ट महिन्यात ६९३६ रुग्ण बरे होऊन घरी गेले असून आजपर्यंत जिल्ह्यात एकूण १७५३७ रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. 
महिनाभरात २०६ रुग्णांचा मृत्यू
कोव्हीड-१९ बरोबर रुग्णांना मधुमेह असणे, निमोनिया, ऑक्सिजनचे प्रमाण कमी असणे यामुळे रुग्णांचा मृत्यू झाल्याचे अहवालात समोर आले आहेत. ऑगस्ट महिन्याचा कोरोनामुळे मृत्यू झालेल्या रुग्णांचा अहवाल पहाता २०६ रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. १ ऑगस्ट पर्यत कोरोनामुळे ४७८ मृत्यू झाले होते. तर १ तारखेपासून आज सकाळपर्यत जिल्ह्यात महिनाभरात २०६ रुग्णांचा मृत्यू झाल्याने आज कोरोनामुळे मृत्यू होण्याची संख्या ही ६८४ वर जाऊन पोहचली आहे.

Jewelroof by RC Bafna JewellersShare Business Card - Free Digital Card Maker